Friday, May 08, 2009


सुचतय म्हणुन लिहायचं..
का लिहायचं म्हणुन सुचवायचं
बेधुंद या विचारांना गणितात आखुन ..शब्दांमधे का अडकवायचं !!
कायम बेधुंद होउन कसं चालायचं .. भावनेच्या भरात आपण नाही वाहायचं ..
कोणी काहिही म्हणो कसेही वागो.. आपण बोचतय म्हणुन लिहायचं..

कुणी तरी दु:खी निजतय म्हणुन लिहायचं
कुठेतरी काही तरी विझतय म्हणुन लिहायचं
अध:पतन स्पष्ट दिसतय म्हणुन लिहायचं
त्यांच्यासाठी काळीज झिजतय म्हणुन लिहायचं