Wednesday, January 09, 2008

दोन वेळेस हुकले.. मागे दिवळीत(नोव्हे) अन आत्ता जनेवारीत. घरी जण्याचा विचार मनात घोळत असताना रक्तपेढीला भेट देउन येउ ठरल.
वजन केले..५० च्या पुढे (सहाजीकच होते). हिमोग्लोबीन - ते तर नेहमीच भरतं. चाचणी होताच बाई म्ह्णटल्या sorry madam ऎच.बी. कमी आहे.
नोव्हेंबर मधे १२.५ भरल नव्हत त्यामुळे आत्ता ऎच.बी. चेक करत असताना मनात दाट शंका होती अन ती बाहेर उफ़ळुन पडली.. मन खट्टु झाले.
कॉलेज मधे .. त्य चिन्धी कॅन्टीन चे अती पौष्टिक जेवण - नाश्त्ता काय तर तैलकट इड्ली सांबार - अमु चि कोल्ड कोफ़ि - उरलं सुरलं पॆज लावुन टी-स्पॉट चा वडा पाव - कटिंग ढोसुन देखिल ऎच.बी १३-१३.५ भरायचे अन नेमानी रक्तदानाच्या दालनात अभिमानाने उभी असायची.

कॉलेज मधे रक्त सळसळत असत असे म्हणतात ते पटलं..
मग मेल आत्ता का मंदावलय :-????

तीन वर्ष cancer सोबत झटत असता आजीसोबत cancer चे सर्व stages अगदी कोळून प्यायलो. bed rest सांगितले होते. केस खूप गळायचे ..boy cut..sory sory bob cut करुया असा माझा हट्ट आजी कडे नेहमी. ती माझी आजी.. माझ्याहुन हट्टी !!!
"रोज सकाळी तैल-वेणी " अशी मलाच सक्त ताकीद दिली. वेणी घलुन दिली की अल्ल्ड मुली सारखी ( गोळ्यांची वेळ झाली) असा काहिसा इशारा नानांना देत असे.
sensex चा काटा नभाला टेकला तेव्हा नानांची आठवण उमजली. १९६०-७० साला पासून त्यानीं नेमके ते शरेअर्स हेरले होते. त्यामुळे आता आम्हाला व्यवस्थित अंदाज जमतो (असे मला वाटते :-D). कित्येक mild-severe हॅर्ट ऍटॅकस ना त्यांनी धिटाईने मात करत वयाच्या ७५ वर्षी लाल-पाढंरे टपोर्या दाण्यांचे डाळींबे निर्यात केले. शेवटच्या क्षणांना मॄत्युला बेदरकार सामोरे देत असता एकदम हाताची पकड सोडली तेव्हा अख्ख हॉस्पिटल सुन्न पडलं.

एच.बी १२.५ न भरल्याने डोळ्यात टचकन पाणी उभ...... तेव्हा, नाना आजींचे काही क्षण समोर भासले अन अचानक मंदावलेल रक्त सळसळुन गेलं..

1 comment:

Girish said...

apratim !!